पक्षाच्या शोधात असलेले पक्षाध्यक्ष : राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांना पत्र
मी स्वतःला अननुभवी आणि असहाय्य समजतो. हादेखील माझ्यासमोरचा एक पेच आहे. मी आता पक्षाचा अध्यक्ष आहे. ज्या कुटुंबातून आलो आहे, त्याचं केवळ प्रतीक बनून मी राहू का? केवळ नामधारी पुढारी राहू का? पक्षीय लढायांमधला प्रसंगवश मध्यस्थ बनू का? की माझ्याच हिंमतीवर नवा रस्ता शोधू? त्या प्रवासात तुम्ही माझी साथ द्याल की, केवळ राहुलजी… राहुलजी... अशी घोषणा देत राहाल?.......